mpsc and upsc kattaa
current affairs,gk, history,and many more by educational purposes.
Friday, November 3, 2017
♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७
#UPSC_MPSC_2018
▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.
▪️ देशातील ४७ प्रादेशिक राजकीय पक्षामध्ये तामिळनाडूतील द्रविड मुनेत्र कळघम [द्रमुक] सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे.
▪️ इंग्लंडने स्पेनचा ५-२ असा धुवा उडवून पहिल्यांदाच फिफा १७ वर्षाखालील विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला आहे.
▪️ आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताच्या संग्राम दहियाने पुरुषाच्या दुहेरी ट्रॅप प्रकारात रौप्यपदक पटकावले.
▪️ पर्यटन मंत्रालयाच्या [वारस दत्तक योजनेअंतर्गत] देशातील १४ स्मारकांच्या देखभालीसाठी ७ कंपन्यांसाठी नावे निश्चित करण्यात आली आहेत.
▪️ बिहारमधील मुशाहर या मागास समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या वीस वर्षीय छोटी कुमारी सिंह या मुलीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
@espardha
▪️ इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन विश्वचषक स्पर्धेच्या भारताच्या जितू रायआणि हिना सिद्धूने १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र दुहेरीत सुवर्ण पदकाची कमाई केली.
▪️ देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना केंद्र सरकारने येत्या २ वर्षाकरिता २.११ लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देऊ केले आहे.
▪️ पंजाबमध्ये कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, घोडा, डुक्कर, शेळी, मेंढी, हरीण यासारखे पाळीव प्राणी पाळायचे असल्यास विशिष्ट कर भरावा लागणार आहे.
▪️ श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये १४ वी साऊथ एशियन असोशिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन [SAARC] विधी परिषद २०१७ आयोजित करण्यात आली आहे.
▪️ उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये एनसीईआरटीची पुस्तके सक्तीची करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे.
@esprdha
▪️ पटना पायरेट्स ने गुजरात फॉर्च्युनजायंट्स च्या समोर जाऊन सलग तिसऱ्या वर्षी प्रो कबड्डीचा किताब जिंकला.
▪️ जगातील पहिला हायड्रोजन इंधन सेल द्वारा कार्यंवित पहिला हायब्रीड इलेक्ट्रॉनिक ट्राम सुरु करण्यात आला आहे.
▪️ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केरळ राज्यात पल्लीपूरम येथे एक टेक्नोसिटी परियोजनेचे उदघाटन केले.
▪️ जैकिंडा आर्डेन न्युझीलँडच्या प्रधानमंत्रीपदी शपथ घेतली आहे. त्या सर्वात कमी वयाच्या प्रधानमंत्री झाल्या.
▪️ गुठका बैरण च्या नावे प्रसिद्ध आणि माणिकचंद समूहाचे उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांचे निधन झाले.
▪️ आफ्रिकी देश बुरुंडीने २७ ऑक्टोबर २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय अपराध न्यायालय [ICC] च्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. असे करणारा हा पहिला देश ठरला आहे.
▪️ अलोक कुमार पटेरीया को केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल चे अतिरिक्त महानिदेशिक नियुक्त करण्यात आले.
▪️ गगनजीत भुल्लर ने मकाऊ ओपनचा आपला आठवा आशियाई टूर टायटल पदक प्राप्त केले आहे.
▪️ लुईस हैमिल्टन ने US ग्रँड प्रिक्स स्पर्धेचे पदक जिंकले आहे.
▪️ तेलंगणाच्या वारंगल येथे १२०० एकरावर निर्मित मेगा टेक्स्टाईल पार्क विकसित करण्यात येईल हा देशातला सर्वात मोठा वस्त्रोद्योग पार्क असेल.
▪️ आफ्रिकी विकास बँकचे अध्यक्ष डॉ अकिनवूमी आयोदेजी एडीसीनाला २०१७ च्या विश्वखाद्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Credit by #espardha
➖➖➖♦️➖➖➖♦️➖➖➖
Sunday, October 29, 2017
महाराष्ट्राचा भूगोल (Geography of Maharashtra) Category: Geography (भूगोल)
महाराष्ट्र राज्य:
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली.
स्थापनेचा वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके, 4
प्रशासकीय विभाग होते.सध्यास्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे,
355 तालुके, 535 शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग
आहेत.
महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:
1. कोकण ( 30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/
सिंधुदुर्ग.
2. पुणे/प.महाराष्ट्र ( 57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
3. नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
4. औरंगाबाद/मराठवाडा ( 64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी,
हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
5. अमरावती/प.विदर्भ ( 46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
6. नागपूर/पूर्व.विदर्भ ( 51336 चौ.किमी):नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
नैसर्गिक सीमा :
1. वायव्येस
: सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील
अक्राणी टेकड्या.
2. उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
3. ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
4. पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
5. दक्षिणेस
: हिरण्यकेशी नदी व कोकणातील
तेरेखोल नदी.
6. पश्चिमेस : अरबी समुद्र.
राजकीय सीमा व सरहद्द :
1. वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
2. उत्तरेस : मध्यप्रदेश.
3. पूर्वेस : छत्तीसगड.
4. आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
5. दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.
राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :
1. गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुले
2. दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
3. मध्ये प्रदेश
: नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा,
गोंदिया
4. छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
5. आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
6. गोवा : सिंधुदुर्ग
महाराष्ट्रचे भारतातील स्थान :
भारतातील 29 राज्यांपैकी एक.
भारताच्या मध्यवर्ती भागात .
महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र
आणणारी विशाल भूमी आहे .
1. विस्तार
अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.
2. आकार
व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर
उत्तरेस रुंद.
पाया – कोकणात व निमुळते टोक विदर्भात.
3. लांबी, रुंदी व क्षेत्रफळ
लांबी = पूर्व – पश्चिम – 800 किमी.
रुंदी = दक्षिण – उत्तर – 720 किमी.
क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्येप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3
रा क्रमांक लागतो.
महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.
जिल्हे निर्मिती :
1. 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग ( 27 वा जिल्हा )
औरंगाबादपासून – जालना ( 28 वा जिल्हा )
2. 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर ( 29 वा जिल्हा ),
26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली ( 30 वा जिल्हा )
3. 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर ( 31 वा जिल्हा )
4. 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार ( 32 वा जिल्हा )
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा )
5. 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली ( 34 वा जिल्हा )
भंडारा – गोंदिया ( 35 वा जिल्हा )
6. 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर ( 36 वा जिल्हा )
Saturday, October 28, 2017
जगाविषयी सामान्य ज्ञान.
* श्रीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.
* नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.
* जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.
* येशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.
* जेरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
* अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.
* फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.
* व्हॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.
* बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण.
* इंग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.
* लंडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.
* नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.
* चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.
* स्वित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.
* केनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.
* जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.
* रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.
* नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.
* चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून म्हणतात.
* स्वीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश.
* दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.
* टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.
* नेदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.
* तुर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.
* हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.
* अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने ओळखतात.
* अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.
* लंडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.
* दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला.
* मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.
* दुबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला.
* फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)
* बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.
* शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.
* फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.
* ल्हासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे.
* बंकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.
* मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते.
* पॅरिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.
* लंडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने प्रसिद्ध आहे.
* चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.
* बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.
* ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.
* अॅमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.
* इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे.
* चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात.
* इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे.
* जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.
* ग्रीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.
* ब्राझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज म्हणतात.
* दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज म्हणतात.
* इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर.
* रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा
* अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट
* चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली
* भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस
* व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे.
* ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे.
* मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.
* हेग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.
* केप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.
* ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.
* मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.
* अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.
* नेपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.
* आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.
* रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.
* थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.
* मुंबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.
* चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.
* कॅनडा सर्वात लांब रस्ते.
* जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.
* चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.
* कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे.
* ब्राझील कॉफी उत्पादनात प्रथम.
* भारत चहा उत्पादनात प्रथम.
* बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.
* घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.
* अमेरिका मका उत्पादनात प्रथम.
* सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.
* क्युबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.
* चिली तांबे उत्पादनात प्रथम.
* मॅगनीज उत्पादनात रशिया प्रथम.
* कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.
* अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.
* कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.
* अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम
* जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.
* शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.
* इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.
* जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.
* इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
वालचंद हिराचंद
*भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना काढला*
*जन्मदिन - २३ ऑक्टोबर इ.स. १८८२*
वालचंद हिराचंद यांचा जन्म २३ ऑक्टोबर इ.स. १८८२ ला सोलापूर येथे झाला. वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले. बार्शी लाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रँच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली. मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल बांधण यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये वालचंद हिराचंद यांनी त्यांच्यातील धडाडी दाखवली.
ब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकते माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले होते; मात्र न डगमगता ब्रिटिश व्यवस्थेशी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली; तसेच ब्रिटिशांच्या मर्जीतील जहाजे चालवणारी बीआय(ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगशन कंपनी) ही कंपनी विकत घेण्याची भाषा केली.
जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले. बॉम्बे सायकल अॅन्ड मोटार ही मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी हिंदुस्थान एअरक्राफ्ट या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. पाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबविला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.
प्रीमिअर इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंदिया स्टीमशिप कंपनी, रावळगाव शुगर फॅक्टरी, अॅक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अॅन्ड मोटार कंपनी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, वालचंद कूपर लिमिटेड, वालचंदनगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली.
उल्लेखनीय
डिसेंबर २३, इ.स. १९४० रोजी हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना त्यांनी, तत्कालीन म्हैसूर राज्यात बंगलोर येथे सुरू केला. याच 'हिंदुस्थान एअरक्रॉफ्ट लिमिटेड' कंपनीचे पुढे इ.स. १९६४ साली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असे नामांतर झाले. या कंपनीने आजपर्यंत, भारतातील अत्याधुनिक विमानांच्या निर्मितीचे आणि देखभालीचे काम केले आहे.
Friday, October 27, 2017
‘सोफिया’ या यंत्रमानवाला सौदीनं नुकतंच नागरिकत्त्व बहाल
एखाद्या यंत्रमानवाला नागरिकत्त्व देऊ करणारा सौदी अरेबिया हा पहिलाच देश ठरला आहे.‘सोफिया’ या यंत्रमानवाला सौदीनं नुकतंच नागरिकत्त्व बहाल केलं. मानवानं यंत्रमानवाची निर्मिती केली. यंत्रमानवाच्या येण्यानं अनेक अवघड कामं सोपी झाली. हळूहळू हा यंत्रमानव अधिक स्मार्ट करण्याच्यादृष्टीने अनेक देशांतील वैज्ञानिकांनी प्रयत्न केले. मानवी भावना ओळखणे, त्याप्रमाणे प्रतिसाद देणं, त्याच्या आयुष्यातल्या अनेक गरजा भरून काढणं अशा वेगवेगळ्या पद्धतीचे बदल यंत्रमानवात करण्यात आले. त्यामुळे फक्त मालकानं दिलेली आज्ञा पाळणं एवढी भूमिका न बजावता त्यामागची भावना आणि उद्देश समजून मग त्यावर प्रतिसाद देण्याएवढा हा यंत्रमानव ‘स्मार्ट’ झाला.
वारसास्थळांच्या दिनदर्शिकेत ताजमहालचा समावेश
2018 वर्षासाठी योगी सरकारने ऐतिहासिक वारसास्थळांचा उल्लेख असणारी दिनदर्शिका प्रसिद्ध केली. यात ताजमहालला स्थान देण्यात आले. दिनदर्शिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र छापण्यात आले. दिनदर्शिकेवर भाजपची ‘सबका साथ, सबका विकास’ ही घोषणा नमूद आहे. या अगोदर राज्याच्या पर्यटन विभागाने काढलेल्या पुस्तिकेत ताजमहालला स्थान न मिळाल्याने वाद निर्माण झाला होता. ऐतिहासिक वारसास्थळांच्या दिनदर्शिकेत गोरखनाथ मंदिराला देखील स्थान मिळाले. काशी विश्वनाथ मंदिर, विंध्याचल, मथुरा येथील होळी, कृष्ण जन्मस्थान, झाशीतील किल्ला, सारनाथ, अयोध्येची राम की पैडी, त्रिवेणी संगम आणि पीलीभीत येथील गुरुद्वारा यांचा दिनदर्शिकेत समावेश करण्यात आला. संगीत सोम यांच्या ताजमहाल विषयक वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. सोम यांच्या वक्तव्याला खोडून काढत मुख्यमंत्री योगींनी ताजमहालवर भारतीयांना गर्व असल्याचे म्हटले होते.
_*रक्ताविषयी काही मजेशीर माहिती*_
_रक्ताविषयी तुम्हाला माहीत नसलेल्या काही गोष्टी नक्की वाचा_
🔸जगातील पहिली रक्त पेढी १९३७ रोजी बनवण्यात आली होती.
🔸आपल्या शरीरातील रक्ताचा ७० टक्के भाग लाल रक्तपेशींच्या आतमध्ये असलेल्या हिमोग्लोबिनमध्ये असतो. ४ टक्के भाग मांसपेशींच्या प्रोटीन मायोग्लोबीन मध्ये, २५ टक्के भाग यकृत, बोन मॅरो, प्लीहा, मूत्रपिंडामध्ये असते आणि उरलेले १ टक्का रक्त प्लाजमाच्या तरल अंश व कोशिकांच्या एंजाइम्समध्ये असते.
🔸१ मिली रक्तामध्ये १०,००० पांढऱ्या रक्तपेशी आणि २,५०,००० प्लेटलेट्स असतात.
🔸आपल्या नसांमध्ये ४०० किलोमीटर प्रतितास या वेगाने रक्ताभिसरण होते.
🔸रक्त कोशिकांना संपूर्ण शरीरात फिरण्यास ३० सेकंद लागतात. या रक्त कोशिका २० सेकंदामध्ये १२००० किमी अंतर पार करू शकतात.
🔸जर आपल्या शरीराने रक्ताला बाहेर पंप केले, तर हे रक्त ३० मीटरपर्यंत उडू शकते.
🔸मनुष्याचे रक्त फक्त ४ प्रकारचे (O, A, B, AB) असते. पण गाईंमध्ये जवळपास ८००, कुत्र्यांमध्ये १३ आणि मांजरांमध्ये ११ प्रकारचे रक्त पाहण्यास मिळते.
🔸नुकत्याच जन्मलेल्या बालकामध्ये फक्त १ कप (२५० एमएल) रक्त असते आणि तरुण माणसामध्ये जवळपास ५ लिटर रक्त असू शकते, म्हणजेच शरीराच्या एकूण वजनाच्या ७ टक्के रक्त असते.
🔸आतापर्यंत कृत्रिम रक्त बनवले गेले नाही आहे.
🔸लाल रक्त पेशी ह्या ऑक्सिजनला घेऊन जात असतात आणि कार्बनडायऑक्साईड संपवतात.
🔸पांढऱ्या रक्त पेशी ह्या शरीराला बॅक्टेरीया आणि वायरस यांच्यापासून वाचवतात.
🔸प्लाजमा हे शरीरात प्रोटीन तयार करते आणि रक्ताला गोठण्यापासून वाचवते.
🔸प्लेटलेट्स हे रक्ताला गोठ्ण्यास मदत करते, यांच्यामुळेच जखम झाल्यानंतर काही वेळ रक्त आल्यानंतर रक्त येण्याचे बंद होते.
🔸गर्भवती स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रिया रक्तदान करू शकत नाहीत.
🔸शारीरिकदृष्ट्या एकाच वेळी लघवी करणे आणि रक्तदान करणे शक्य नाही.
🔸जेम्स हॅरीसन नावाच्या व्यक्तीने गेल्या ६० वर्षांमध्ये १००० वेळा रक्तदान केले आहे आणि २० लाख लोकांचे प्राण त्याने वाचवले आहेत.
🔸प्रत्येक दिवशी जगात ४०००० युनिट रक्ताची गरज असते. ३ पैकी १ व्यक्तीला आपल्या जीवनात कधी न कधी रक्ताची आवश्यकता नक्कीच पडते.
🔸स्वीडनमध्ये जेव्हा कोणी रक्तदान करते, तेव्हा त्याला “Thank You” असा मॅसेज केला जातो आणि असाच मॅसेज जेव्हा त्याचे रक्त एखाद्याच्या कमी येते, तेव्हा देखील केला जातो.
🔸जपानमध्ये लोक रक्त गटावरूनच माणसाच्या व्यक्तित्वाचा अंदाज लावतात.
🔸ब्राझील देशात बोरोरो नावाचा आदिवासी समूह आहे, आश्चर्याची बाब म्हणजे या समूहातील सर्व लोकांचा एकच ” O “ रक्तगट आहे.
🔸जवळपास सर्वांमध्ये लाल रंगाचे रक्त पाहण्यास मिळते, पण कोळी आणि गोगलगायमध्ये हलक्या निळ्या रंगाचे रक्त पाहण्यास मिळते.
🔸आपल्या शरीरामध्ये जवळपास ०.२ मिलिग्रॅम एवढे सोने असते आणि याचे सर्वात जास्त प्रमाण रक्तात आढळून येते. ४०००० लोकांच्या रक्तामधून जवळपास ८ ग्रॅम सोन काढले जाऊ शकते.
🔸फक्त मादा मच्छरच माणसांचे रक्त शोषून घेते, नर मच्छर हे शाकाहारी असतात आणि ते फक्त गोड द्रव पदार्थ पितात. मादा मच्छर या आपल्या वजनाच्या तीनपट जास्त रक्त पिऊ शकतात.
🔸तुम्हाला वाटत असेल कि, मच्छर फक्त थोडच रक्त पितात, पण तुम्हाला सांगू इच्छितो की, १२ लाख मच्छर तुमचे पूर्ण रक्त पिऊ शकतात. मच्छर “ O ” रक्तगटाचे रक्त पिणे पसंत करतात.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
Subscribe to:
Posts (Atom)
♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७
#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...

-
पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी??? *ट्रीक-* राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रा...
-
99 वी घटनादुरूस्ती : ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगल...
-
१) सुभाषचंद्र बोस -- नेताजी २) रविंद्रनाथ टागोर -- गुरुदेव ३) पंडित जवाहरलाल नेहरू -- चाचा ४) मोहनदास करमचंद गांधी -- राष्ट्रपिता ५)...