लघु-वित्त बँक :
आर्थिक समावेशकता वाढविण्याच्या दृष्टीने लहान भरणा बँका आणि पेमेंट बँकांची स्थापना करण्याचा निर्णय रिझव्र्ह बँकेने घेतला
आरबीआयला लघु वित्त बॅंकेसाठी 72 अर्ज अर्ज मिळाले होते यातून रिझव्र्ह बँकेने विविध 10 कंपन्यांना प्राथमिक मंजुरी दिली.
अर्जदारांना प्राथमिक मंजुरी देण्यासाठी रिझव्र्ह बँकेने 3 स्वतत्र समीत्यांची नेमणूक केली होती. मंजुरी देण्यापूर्वी रिझव्र्ह बँकेने उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली,सेबीचे माजी सदस्य एम. एस साहू,आआयम बेंगळूरचे प्रा. एम. एस. श्रीराम आणी एनपीसीआयचे अध्यक्ष एम. बालचंद्रन यांचा समावेश होता
लघु-वित्त बँकांसाठीची ही प्राथमिक मंजुरी 18 महिन्यांसाठी राहणार असून या कालावधीत संबंधित कंपन्यांना उर्वरित प्रक्रियेची पूर्तता करणे बंधनकारक ठरेल.
लघु वित्त बॅंक म्हणजे काय आहे?
लघु वित्त बॅंका ठेवी स्वीकारू शकतात आणि कर्ज देऊ शकणार आहेत. परंतू यातील 75 टक्के कर्ज हे शेती, एसएमईला देणे बंधनकारक असणार आहे.
लघु वित्त बॅंका 25 लाख रुपयापर्यंतचे कर्ज देऊ शकतात.
बॅंक शाखा उघडल्याच्या त्यांच्या पहिल्या 3 वर्षांसाठी त्यांना ज्याठिकाणी बँकिंग सेवा नाहीत, अश्या ठिकाणी बॅंक सेवा देणे बंधनकारक आहे.
सुरुवातीला प्रवर्तकांची बँकेतील हिस्सेदारी 40 टक्के असणार असून पुढील 12 वर्षात त्यांना हिस्सेदारी कमी करून 26 टक्के करणे बंधनकारक असेल.
लघु वित्त बँकेत परदेशी गुंतवणूकदार संस्था (एफआयआय) 74 टक्के पेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही
नव्या 10 लघु-वित्त बँका :
1.एयू फायनान्शियर्स (इंडिया) लि. जयपूर
2.कॅपिटल लोकल एरिया बँक लि. जालंधर
3.दिशा मायक्रोफिन प्रा. लि.अहमदाबाद
4. इक्विटास होल्डिंग्ज पी लिमिटेड, चेन्नई
5. ईएसएएफ मायक्रोफायनान्स अॅन्ड इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि.चेन्नई
6. जनलक्ष्मी फायनान्शिअल सव्र्हिसेस प्रा. लि.बंगळुरु
7. आरजीव्हीएन (नॉर्थ इस्ट) मायक्रोफायनान्स लि.गोहत्ती
8.सुर्योदय मायक्रो फायनान्स प्रा. लि.नवी मुंबई
9. उज्जीवन फायनान्शिअल सव्र्हिसेस प्रा.लि.बंगळुरु
10.उत्कर्ष मायक्रो फायनान्स प्रा. लि.वाराणसी
No comments:
Post a Comment