दिनविशेष : 3 मे
- 'भारतीय महिला विद्यापीठ' या संस्थेची 3 जून1831 मध्ये स्थापना झाली. 1920 मध्ये'श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ' (एस.एन.डी.टी.) असे नामांतरकरण्यात आले.
- 3 मे 1890 मध्ये सरहद्ध गांधी 'खान अब्दुल गफारखान' यांचा जन्म झाला.
विमान निर्मितीसाठी संयुक्त प्रकल्प :
- भारताला रशिया अणुऊर्जा निर्मितीसाठी 25 हजार कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे.
- भारताच्या सगळ्यात मोठ्या अणुऊर्जा निर्मितीच्या तामिळनाडूतील प्रकल्पाच्या पाच आणि सहा क्रमांकाच्या संच बांधणीचा खर्च 50हजार कोटी रुपये असून, त्याचा निम्मा भाग रशिया कर्जरूपाने देणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात 1 जून रोजीझालेल्या वार्षिक शिखर भेटीत कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या दोन नव्या रिअॅक्टर्ससाठी उभय देशांत करारावर स्वाक्षरी झाली.
- तसेच या प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मितीला सात वर्षे लागतील, असे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे(एनपीसीआयएल) अध्यक्ष आणिव्यवस्थापकीय संचालक एस.के. शर्मा यांनी सांगितले.
लिओ अशोक वराडकर आयर्लंडचे नवे पंतप्रधान :
- मूळचे महाराष्ट्रातील मालवणचे असलेलेलिओ अशोक वराडकर यांची आयर्लंडचे पंतप्रधान म्हणून निवड झाली.
- आयर्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत वराडकर यांनी शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मते मिळवत हा ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी सिमोन कोव्हिने यांचा पराभव केला.
- आयर्लंडमध्ये 2007 मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये लिओ सर्वप्रथम निवडून आले होते. लवकरच त्यांना उपमहापौरपद भूषवण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदापर्यंत मजल मारली होती.
- 'पंतप्रधान झाल्यास देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा; तसेच राजकीय स्थैर्य देण्याचा माझा प्रयत्न असेल', अशी भूमिका वराडकर यांनी मांडली होती.
- भारतीय वंशाच्या लिओ वराडकर यांना आयर्लंडमधील पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे पाहून त्यांच्या भारतातील कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे.
समीर दिघे यांची मुंबई संघाचे प्रशिक्षकपदी निवड :
- मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी भारताचे माजी यष्टीरक्षक समीर दिघे यांची निवड केली.
- यंदा रणजी विजेतेपद राखण्यात अपयशी ठरलेले चंद्रकांत पंडित यांची जागा घेण्यास दिघे यांच्यासह माजी कसोटीपटू प्रवीण आमरेयांचेही नाव मुंबई प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते.
- मुंबई क्रिकेट संघटनेने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, 'समीर दिघेयांना 2017-18 मोसमासाठी मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी निवडण्यात आले आहे.'
- मुंबई निवड समितीचे प्रमुख आणि माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील एमसीएच्या क्रिकेट सुधार समितीने घेतलेल्या बैठकीमध्ये 48 वर्षीय दिघे यांची प्रशिक्षकपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
'पृथ्वी-2' क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी :
- अण्वस्त्र वाहक भारतीय बनावटीच्या पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राची ओडिशातील चांदीपूरनजीकच्या एकात्मिक चाचणी तळावरूनयशस्वी चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 350 किलो मीटर आहे.
- फिरत्या प्रक्षेपकातून 2 जून रोजी सकाळी 9.50वाजता हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. 500 ते 1हजार किलो अण्वस्त्रे वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. यात प्रगत दिशादर्शक प्रणालीचा वापर करण्यात आलेला असल्याने हे क्षेपणास्त्र अचूक वेध घेते.
- 21 नोव्हेंबर 2016 रोजी ही यशस्वी चाचणी पार पडली होती. 2003 मध्ये लष्करात सामील करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केले आहे.
No comments:
Post a Comment