Thursday, June 15, 2017
बांधावरती येता का?
मुख्यमंत्री साहेब A/C मधून
बांधावरती येता का ?
काही नाही शेतकऱ्यांचे
दुखणे समजून घेता का?😢
तुमची बायको छान
अमिताभ सोबत नाचती आहे
बघा माझी कारभारीण
दिवस-रात राबती आहे
ऊन,वारा,पावसात देखील
ती माझी सोबती आहे
लोडशेडींग मूळं दारं धराया
रात्रभर ती जागती आहे
कुठल्या जन्माचे पाप
ती माझ्या सोबत भोगती आहे
कर्जमाफी करणार म्हणून
आशेनं वाट बघती आहे
तीने केलेल्या कष्टाला
हमीभाव ती मागती आहे
आमच्या सोबत डबक्यातले
अशुद्ध पाणी पिता का ?
मुख्यमंत्री साहेब A/C मधून
बांधावरती येता का ?
काही नाही शेतकऱ्यांचे
दुखणे समजून घेता का?😢
तुमचं पोरगं A/C मधून
कॉनवेंट मधे जातं
माहितीय का काटा टोचल्यावर
किती दुःख होतं?
बाळ माझं तसल्या काट्यांतून
भाकरी घेऊन येतं
पावसात,वीजात अंगावर
पांघरूण घेऊन पोतं
वासरु माझं झाडाखाली
भिजत बसून रहातं
आजारी पडून दोन दिवस
वाजवत रहातं दातं
कसे नेनार दवाखान्यात
पैसाच करतो घातं
मी आत्महत्या करू नये म्हणून रात्री
आंगावर माझ्या ठेऊन हातं
सोनूलं माझं मला
चीटकून झोपी जातं
माझ्या त्या वासराचे
आश्रु पुसून देता का ?
मुख्यमंत्री साहेब A/C मधून
बांधावरती येता का ?
काही नाही शेतकऱ्यांचे
दुखणे समजून घेता का ?😢
धान्य पिकवतो शेतकरी
भाव ठरवतो व्यापारी
तुम्ही आणि तुमचे दलाल
लावता आहात गळ्यास सूरी
सांगा साहेब ही
रीत वाटते का बरी ?
पिकवणाराच्या हातामधे
किती दिवस देणार तूरी ?
वामण अवतार सोडून
बळीराजा तुम्ही होता का?
मुख्यमंत्री साहेब A/C मधून
बांधावरती येता का ?
काही नाही शेतकऱ्यांचे
दुखणे समजून घेता का ?😢
शेतकरी असाल तर नक्की पुढे पाठवा 🙏🏻😢
Subscribe to:
Post Comments (Atom)
♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७
#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...

-
पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी??? *ट्रीक-* राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रा...
-
🔹 सीना नदी भीमा नदीची एक उपनदी. लांबी सु. ३७५ किमी. पाणलोट क्षेत्र सु. १२,७४२ चौ. किमी. महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात अहमदन...
-
99 वी घटनादुरूस्ती : ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगल...
No comments:
Post a Comment