Thursday, June 15, 2017

चालू घडामोडी प्रश्नसचं


खालील विधाने विचारात घ्या:
अ. मोदी सरकारने काळा पैसा शोधून काढण्यासाठी मंत्रीमंडळाच्या पाहिल्याच बैठकीत तपास पथक गठित केले आहे.
ब. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अशोककुमार माथूर हे विशेष तपास पथकाचे प्रमुख आहेत.
क. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम.बी. शाह हे या पथकाचे उपप्रमुख आहेत.
वरील विधानांपैकी कोणती विधाने चुकीचे आहेत?
  1. फक्त अ
  2. फक्त ब
  3. फक्त क
  4. फक्त अ आणि क  
उत्तर : फक्त अ आणि क   

2. अंशू जमसेंपा कोण आहेत?
अ. हिमाचल प्रदेशाच्या महिला गिर्यारोहक
ब. हिमालयाची तीन शिखरे चढून इतिहास रचणार्‍या
क. माऊंट एव्हरेस्ट दोनदा चढून जाणार्‍या जगातील पहिल्या माता
ड. नेपाळ सरकारतर्फे गौरविण्यात आलेल्या
  1. अ, ब आणि क बरोबर ड चूक
  2. ब आणि क बरोबर अ आणि ड चूक
  3. ब, क आणि ड बरोबर अ चूक  
  4. सर्व बरोबर
उत्तर : ब, क आणि ड बरोबर अ चूक

3. खालील विधानांपैकी 'पश्चिम घाटा' संबंधी कोणते विधान बरोबर नाही?
  1. यूनेस्कोने (UNESCO) 'जागतिक वारसा' ठिकाण म्हणून घोषित
  2. जगातील सर्वांत जास्त जैवविविधता असणार्‍या जागांपैकी एक
  3. पश्चिम घाटाचा भारताच्या सहा राज्यांत प्रसार
  4. कळसूबाई शिखर हे पश्चिम घाटातील सर्वांत उंच शिखर आहे.   
उत्तर : कळसूबाई शिखर हे पश्चिम घाटातील सर्वांत उंच शिखर आहे.

4. 2014 मध्ये ग्लास्गो-स्कॉटलँड येथे भरलेल्या कॉमनवेल्थ खेळात भारताने किती पारितोषिके जिंकली?
  1. सुवर्ण -15, रजत -30, कांस्य -19 = एकूण - 64   
  2. सुवर्ण -19, रजत -30, कांस्य -15 = एकूण - 64
  3. सुवर्ण -15, रजत -19, कांस्य -30 = एकूण - 64
  4. सुवर्ण -16, रजत -30, कांस्य -18 = एकूण - 64
उत्तर : सुवर्ण -15, रजत -30, कांस्य -19 = एकूण -64  

5. डिसेंबर 2015 मध्ये सौदी अरेबिया मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये प्रथमच प्रौढ सौदी अरेबियन स्त्रियांना मतदान करू देण्यात आले.
  1. शुरा परिषद
  2. नगरपालिका  
  3. राष्ट्रीय
  4. प्रादेशिक
उत्तर : नगरपालिका

6. पुढील कोणाला फ्रेंच सरकारचा 'लिजेंड ऑफ ऑनर' हा पुरस्कार प्राप्त झाला आहे?
अ. शक्ती बर्मन
ब. पंडित रविशंकर
क. सत्यजीत राय
ड. एम.एफ. हुसैन
  1. फक्त अ, ब व क   
  2. फक्त ब, क व ड
  3. फक्त अ, ब व ड
  4. फक्त अ, क व ड
उत्तर : फक्त अ, ब व क

7. 'मेक इन इंडिया' सप्ताहाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
अ. त्याचे आयोजन मुंबईमध्ये 13 ते 18 फेब्रुवारी 2016 दरम्यान केले गेले.
ब. स्वीडन आणि फिनलँड देशाचे पंतप्रधान उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होते.
  1. केवळ अ
  2. केवळ ब
  3. दोन्ही
  4. एकही नाही  
उत्तर : एकही नाही

8. 13 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबाबतीत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?
  1. सर्वोत्कृष्ट चित्रपट - बजरंगी भाईजान
  2. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - दम लगा के हैशा   
  3. सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट - बाहुबली
  4. नर्गीस दत्त पुरस्कार - तनू वेड्स मनू रिटर्न्स
उत्तर : सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - दम लगा के हैशा

9. 2016-17 रेल्वे अंदाजपत्रक सादर करतेवेळी घोषित केल्या गेलेल्या नवीन रेल्वे गाड्याबाबत जोड्या लावा.
अ. तेजस      1. पूर्णत: वातानुकूलित सेवा
ब. हमसफ     2. पूर्णत: अनारक्षित सेवा
क. अंत्योदय  3. डबल डेकर वातानुकूलित
ड. उदय        4. अतिवेगवान गाडी (130 किमी. प्रतितास)
  1. अ-1, ब-2, क-3, ड-4  
  2. अ-4, ब-1, क-2, ड-3
  3. अ-4, ब-3, क-2, ड-1  
  4. अ-3, ब-4, क-1, ड-2
उत्तर : अ-4, ब-1, क-2, ड-3

10. शरद जोशी यांनी पुढीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहेत?
अ. अॅन्सरिंग बिफोर गॉड   
ब. डाऊन टू अर्थ
क. द वुमन्स क्वेश्चन
ड. फार्मरस पेरिल
  1. फक्त अ, ब व क  
  2. फक्त अ, ब व ड
  3. फक्त अ, क व ड
  4. फक्त ब, क व ड
उत्तर : फक्त अ, ब व क

No comments:

Post a Comment

♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७

#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...