Tuesday, June 13, 2017

चालु घडामोडी प्रश्नसंच



1. 'न्यू मूर' या बेटावरून सध्या कोणत्या दोन देशांमध्ये वाद सुरू आहे?
  1. भारत आणि चीन
  2. भारत आणि पाकिस्तान
  3. भारत आणि बांगला देश  
  4. भारत आणि श्रीलंका
उत्तर : भारत आणि बांगला देश

2. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार (नोटा) उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
  1. मध्य प्रदेश
  2. राजस्थान
  3. छत्तीसगढ
  4. महाराष्ट्र   
उत्तर : महाराष्ट्र

3. 1.1. 2014 रोजी महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या ..... होती.
  1. 9.50 कोटी
  2. 8.25 कोटी
  3. 7.89 कोटी  
  4. 6.75 कोटी
उत्तर : 7.89 कोटी

4. खालील विधाने विचारात घ्या:
अ. मा. राष्ट्रपतीनी लोकपाल विधेयक 2013 ला 1 जानेवारी 2014 रोजी मान्यता दिली.
ब. लोकपाल यांच्या न्यायाधिकारात पंतप्रधान, मंत्री व खासदार येतात.
  1. अ बरोबर व ब चूक
  2. अ चूक व ब बरोबर
  3. अ व ब दोन्हीही बरोबर   
  4. अ व ब दोन्हीही चूक
उत्तर : अ व ब दोन्हीही बरोबर

5. साहित्य अकादमी पुरस्कार, 2013 मराठीसाठी निवड समितीचे सदस्य कोण होते?
अ. डॉ. सदानंद मोरे
ब. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
क. वसंत आबाजी डहाके
ड. प्रो. विलास खोले
  1. अ, ब, क
  2. ब, क, ड
  3. अ, ब, ड
  4. अ, क, ड
उत्तर : अ, ब, ड

6. 2013 मध्ये मंगळ यान हे कोणत्या ठिकाणावरून सोडण्यात आले?
  1. भुवनेश्वर
  2. बंगळुरू
  3. श्रीहरिकोटा  
  4. हैदराबाद
उत्तर : श्रीहरि कोटा

7. जागतिक वरसास्थळ यादीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
अ. शनिवारवाडा आणि शिद्यांची छत्री
ब. अजिंठा आणि वेरूळ
क. कासचे पठार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस
ड. नांदेड येथील गुरुव्दारा आणि ज्ञानेश्वर समाधी
  1. अ आणि ब
  2. ब आणि क  
  3. क आणि ड
  4. अ आणि ड
उत्तर : ब आणि क

8. 'प्लॅनिंग अँड दि पुअर' या ग्रंथाचे लेखन कोणी केले?
  1. डॉ. वि. म. दांडेकर
  2. प्रो. अमर्त्य सेन
  3. डॉ. नरेंद्र जाधव
  4. डॉ. बी.एस. मिंहास   
उत्तर : डॉ. बी.एस. मिंहास

9. झुम्पा लहरी यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य ठरेल?
  1. त्या 'भारत-पाक कथा, कादंबरीकर' आहेत.
  2. मॅन बुकर परितोषिकांच्या अंतिम सहा पुस्तकात 2013 मध्ये त्यांच्या पुस्तकाची निवड झाली.  
  3. त्यांच्या 'इंटरप्रिटर' या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला
  4. वरीलपैकी सर्व
उत्तर : मॅन बुकर परितोषिकांच्या अंतिम सहा पुस्तकात 2013 मध्ये त्यांच्या पुस्तकाची निवड झाली.

10. देशातील घन कचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीच्या पहिला प्रकल्प कोणत्या महानगर पालिकेने सुरू केला आहे?
  1. पिपरीचिंचवड महानगरपालिका
  2. पुणे महानगरपालिका   
  3. मुंबई महानगरपालिका
  4. ठाणे महानगरपालिका
उत्तर : पुणे महानगरपालिका

No comments:

Post a Comment

♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७

#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...